Uncategorized

अकलूजच्या डी.फार्मसी कॉलेजमध्ये महिलांच्या आरोग्य विषयक व्याख्यान संपन्न

भूमीपुत्र न्यूज/ केदार लोहकरे

अकलूज येथील कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा)मध्ये घे भरारी या AMOGS राज्यस्तरिय स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्य project अंतर्गत व IMA Mission Pink Health या national Project अंतर्गत मुलींच्या व महिलांच्या आरोग्यविषयक व्याख्यान घेण्यात आले होते. यावेळी अकलूज येथील स्त्री रोग तज्ञ डॉ.रेवती राणे यांनी मुलींना मार्गदर्शन केले.


डि फार्मसी कॉलेजच्या वतीने महिला आरोग्य व स्वच्छता या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्याचे उदघाटन डॉ.रेवती राणे यांचे हस्ते स म शंकरराव मोहिते पाटील व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करून करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब देवडकर होते.

महिला आरोग्य व स्वच्छता विषयावरील व्याख्यानातून ॲपेक्स हॉस्पिटलच्या डॉ.रेवती राणे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना तरुण मुली व मुले यांना आहार,शाररिक,मानसिक, लैंगिक,आरोग्य व स्वच्छता या विषयावर बोलताना मुलींच्या तारूण्य अवस्थेत शारिरीक होणारे बदल व त्या समस्येवर मुलींनी स्वतः ची कोणती काळजी घेणे गरजेचे आहे यावर मार्गदर्शन केले.याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व महिला कर्मचारी यांच्याशी महिलांविषयी समस्याची चर्चा करून त्यांच्या शंकेचे निरसन केले.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थींनी,प्राध्यापिक व महिला वर्ग उपस्थित होता. प्रास्ताविक प्रा.प्रणाली ताटे-देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु.भाग्यश्री गायकवाड हिने केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.मोनिका दोशी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!