माळशिरस तालुका पत्रकार संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मंगळवार दि. 27 डिसेंबर रोजी
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या सन 2023 च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा प्रांताधिकारी श्रीमती ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरस तहसील कार्यालय येथे संपन्न होणार असल्याची माहिती माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी भूमीपुत्र न्यूजशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना अध्यक्ष संजय देशमुख म्हणाले की , या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग ,अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड ,माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, तालुका कृषी अधिकारी पूनम चव्हाण ,माळशिरस वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून दिनदर्शिका प्रकाशन करण्याचे हे पाचवे वर्ष आहे . यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शाहरुख मुलानी, लक्ष्मण राऊत, सचिव दिनेश माने देशमुख ,सहसचिव बंडू पालवे ,खजिनदार नितीन मगर ,प्रसिद्ध प्रमुख स्वप्नील राऊत आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
बातमी दुरुस्त करा शेवटी उपस्थित होते ऐवजी उपस्थित राहणार आहेत असे लिहावे
पत्रकार परिषदेत माहीती देताना हे सदस्य उपस्थित होते असे आहे