अकलूज येथे उर्वशीराजे मोहिते पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
भूमीपुत्र न्यूज/ केदार लोहकरे
अकलूज येथे अकलूज शहर महिला काॅग्रेस आय कमिटीच्या वतीने उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.महादेवनगर येथील शैला रमाकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,तिळगुळ वाटप,विविध स्पर्धां घेण्यात आल्या त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अकलूज परिसरातील महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
शेमारू मराठीबाणा या मराठी वाहिनीच्या वतीने अकलूज शहरामध्ये मकर संक्रांत व प्रतापसिंह मोहिते पाटील इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा सौ.उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महादेवनगर येथील महादेव मंदिराच्या परिसरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला.शेमारू मराठी बाणा प्रस्तुत संक्रांत मेळावा या कार्यक्रमात मयूरेश अभ्यंकर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करत विविध स्पर्धा घेतल्या.त्यांना राहूल पाटील व रविन्द्र साळवे यांचे सहकार्य लाभले.
हा महिला मेळावा यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा महिला काॅग्रेस आय कमिटी अकलूज शहर महिला अध्यक्षा शैला रमाकांत गोसावी व त्यांच्या सहकारी महिलांनी परिश्रम घेतले.