महाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसोलापूर जिल्हा

अकोले खुर्दच्या श्री गणपती फार्मसी कॉलेजचे डॉ. सचिन सकट यांना पॅरिसमध्ये ‘मुख्य वक्ते’ म्हणून विशेष निमंत्रण

​आंतरराष्ट्रीय परिषदेत औषध निर्माणशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयावर सादर करणार शोधनिबंध​

माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक व संशोधन वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव

​

भूमीपुत्र न्यूज

मौजे अकोले खुर्द (ता. माढा) येथील श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभुर्णीचे नामांकित प्रा. डॉ. सचिन श्रीधर सकट यांना फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित अत्यंत प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘प्लेनरी स्पीकर’ (मुख्य वक्ते) म्हणून विशेष निमंत्रण मिळाले आहे. आगामी ५ व ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पॅरिस येथे होणाऱ्या ‘इंटरनॅशनल समिट ऑन फार्मास्युटिकल सायन्सेस अँड एआय ॲप्लिकेशन’ या जागतिक परिषदेत ते आपले बहुमूल्य मार्गदर्शन करणार आहेत.​​

डॉ. सचिन सकट यांना औषध संशोधन, प्रिक्लिनिकल फार्माकोलॉजी, टॉक्सिकॉलॉजी आणि ड्रग डिस्कव्हरी या अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्रात १५ वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध संशोधनाचा अनुभव आहे. त्यांनी मुंबई येथील जागतिक पातळीवर नामांकित असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (ICT) येथून फार्माकोलॉजी विषयात आपली पीएच.डी. (Ph.D.) पदवी संपादन केली आहे.​आपल्या संशोधन प्रवासात त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टप्पे सर केले आहेत.

संशोधन काळात त्यांना भारत सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) जेआरएफ (JRF) व एसआरएफ (SRF) फेलोशिप, तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून (DST) विशेष आंतरराष्ट्रीय प्रवास अनुदान प्राप्त झाले होते. यापूर्वी २०१० मध्ये जर्मनीतील बर्लिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतही त्यांनी आपल्या संशोधनाचे यशस्वी सादरीकरण केले होते.​​डॉ. सकट यांच्या नावावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये (Journals) ३४ हून अधिक संशोधन लेख प्रकाशित झाले असून त्यांनी चार शैक्षणिक पुस्तकेही लिहिली आहेत.

त्यांच्या नावावर दोन भारतीय डिझाईन पेटंट्स नोंदवले गेले असून, त्यांच्या संशोधन कामाला जगभरातून १,६०० हून अधिक सायटेशन्स (Citations) मिळाले आहेत, जे त्यांच्या संशोधनाचा दर्जा अधोरेखित करतात.​​डॉ. सचिन श्रीधर सकट यांची पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी मुख्य वक्ते म्हणून झालेली निवड ही केवळ संस्थेसाठीच नव्हे, तर संपूर्ण माढा तालुका आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

त्यांच्या या जागतिक यशाबद्दल श्री गणपती इन्स्टिट्यूटचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे, तसेच संस्थेचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाकडून त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!