माळशिरस तालुकाशैक्षणिकसामाजिकसोलापूर जिल्हा

माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानतर्फे ‘स्नेह मेळावा व सन्मान सोहळा’ मंगळवारी संपन्न होणार​

भूमीपुत्र न्यूज

माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित, ‘ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र’ माळशिरस व अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस-अकलूज रोड (६१ फाटा, माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे भव्य ‘स्नेह मेळावा व सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.

​या सोहळ्यात तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेह मेळावा, नूतन अधिकारी/कर्मचारी तसेच उत्कृष्ट खेळाडू यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा पार पडणार आहे. ​कार्यक्रमाचे ​अध्यक्षस्थानी रंजन कुमार शर्मा (IPS), विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर. ​मुख्य अतिथी संतोष पाटील (IAS), जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, सातारा आणि अतुल कुलकर्णी (IPS), पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण असणार आहेत ​कार्यक्रमास पोलीस व प्रशासकीय सेवेतील अनेक वरिष्ठ अधिकारी, न्यायाधीश आणि विविध विभागांचे उच्चपदस्थ अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

​सन २०२६ मध्ये जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजी या खेळात वैयक्तिक १ कांस्यपदक व सांघिक २ रौप्यपदक पटकावणारे (वयाच्या २२ व्या वर्षी आतापर्यंत एकूण २५ आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई करणारे) तसेच मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी वर्ग-१ पदी निवड झालेले चि. रुद्रांश बाळासाहेब वाघमोडे-पाटील यांचा विशेष सन्मान सोहळ्यात केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ कर्णवर-पाटील, उपाध्यक्ष अमरसिंह पाटील व मनिषा वाघमोडे-शंडे, सचिव सुनिल कर्चे तसेच सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी या स्नेह मेळावा व सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!