माळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा

आषाढी सोहळ्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा वेळापुरात मुक्कामी; वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची रात्रभर वैद्यकीय सेवा

भूमीपुत्र न्यूज

आषाढी एकादशीचा भक्तिमय वातावरणात पार पडलेला सर्वात मोठा सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व संतांच्या पालख्यांनी आपल्या मूळ स्थानाकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. या परतीच्या प्रवासात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी,३० जुलै २०२६ रोजी माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे मुक्कामी होता.

या पार्श्वभूमीवर, माऊलींच्या पालखीसोबत परतीचा प्रवास करणारे हजारो वारकरी आणि दर्शनासाठी आसपासच्या परिसरातून येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राने कौतुकास्पद वैद्यकीय सेवा बजावली.​पालखीच्या मुक्कामादरम्यान वारकऱ्यांना थकवा, किरकोळ आजार किंवा अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशांत हनुमंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने रात्रभर उपस्थित राहून सेवा दिली.

प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत हनुमंत मोरे हे स्वतः सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत रात्रभर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हजर होते. त्यांनी स्वतः प्रत्यक्ष जागेवर राहून सर्व वैद्यकीय व्यवस्था आणि उपचारांचे नियोजन सांभाळले.परतीच्या प्रवासातील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी,थकवा, पायदुखी, ताप, सर्दी आणि किरकोळ दुखापतींवर तातडीने औषधोपचार, कोणत्याही आपत्कालीन प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य पथक पूर्ण सज्ज होते.​​वेळापूर प्राथमिक आरोग्य विभागाच्या वतीने मिळालेल्या या जलद आणि तत्पर वैद्यकीय सेवांमुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या समर्पक भावनेबद्दल आणि मिळालेल्या चांगल्या सुविधांबद्दल वारकऱ्यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आरोग्य विभागाचे विशेष आभार मानले आहेत.

आम्ही ज्यावेळेस वैद्यकीय क्षेत्र शिक्षणासाठी निवडले त्यावेळेसच समर्पणाची भावना ठेवून या क्षेत्रात यावे लागेलं याची जाणीव आहे.लाखो वारकरी श्रद्धेने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे चालत जातात त्यांची सेवा करायला मिळणे हे एक भाग्यच आहे.

डॉ सुशांत हनुमंत मोरे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र वेळापूर

आरोग्य केंद्र वेळापूर ची संपूर्ण वैद्यकीय टीम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!