वेदत्री व्हेंचर एलएलपी कंपनी मधील गुंतवणूकदारांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक

भूमीपुत्र न्यूज
वेदोत्री व्हेंचर एलएलपी नातेपुते ता माळशिरस या कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षित करून गुंतवणूकदारांची विश्वासाने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा देतो असे सांगून नोटरी करार प्रमाणे गुंतवणूक रकमेची परतफेड केली नाही असे एकूण 86 लाख 70 हजार 798 रुपयाची कपटपूर्ण रीतीने फसवणूक केली आहे अशी तक्रार वेदत्री वेंचर कंपनीचे मालक संतोष दत्तू गुरव व विजय वसंत क्षीरसागर दोघेही रा कोथळे ता माळशिरस व सचिन गेनू फुले रा मोरोची ता माळशिरस यांच्याविरुद्ध नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांनी सांगितले की, या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान आरोपी संतोष गुरव व विजय क्षीरसागर यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्याच्या तपासाकामी 2 जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे सदर आरोपींना माळशिरस येथील सत्र न्यायालय हजर केले असता 7 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेले आहे सोलापूर जिल्हा व इतर जिल्ह्यातील नागरिकांना अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी आवाहन केले आहे की, ज्या नागरिकांनी वेदत्री व्हेंचर एलएलपी कंपनी नातेपुते गुंतवणूक केली असेल व ज्यांची फसवणूक झालेली असेल अशा गुंतवणूकदारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज कार्यालय येथे संपर्क साधावा तसेच या प्रकारच्या आकर्षक लाभ देणाऱ्या स्कीम पासून सावध राहावे कमी वेळेत जास्त नफा असल्या भूलथापांना बळी पडू नये असा कोणताही प्रकार चालू असेल तर आपल्या नजीकच्या पोलीस ठाणेस संपर्क साधावा.
आरोपींना अटक करणे कामे जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नातेपुते संपागे पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान देशमुख, गणेश निंबाळकर, विकी घाडगे ,दत्ता खरात ,सचिन भोसले, अजित कडाळे, अनवर आतार यांनी कामगिरी बजावली




