माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला पार्थ कान्हा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी देणार सर्वोच्च दर /सुनील लावंड

भूमीपुत्र न्यूज
खतांच्या व बी बियाणांच्या वाढत्या किंमती या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा अल्प दर यामुळे शेतीकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलला असून ज्यादा उत्पादन झाल्यास ते रस्त्यावर टाकून द्यावे लागते मात्र पार्थ कान्हा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून रोज 25 मे टन कच्च्या शेतीमालाची खरेदी करून 15 मे टन तयार पक्का माल बनवून तो आंतरराष्ट्रीय बाजारात पार्थ कान्हा फार्मर्स प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून विकून माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वोच्च दर देणार असल्याचे प्रतिपादन पार्थ कान्हा फार्मर्स प्रोडूसर कंपनीचे सीईओ सुनील लावंड यांनी सांगितले.

ते विजयवाडी ता माळशिरस येथील पार्थ कान्हा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा भूमीपूजन समारंभ समारंभ प्रसंगी बोलत होते भूमिपूजन समारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दि 24 मार्च रोजी संपन्न झाला यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, युवा उद्योजक सुजयसिंह माने पाटील, संग्रामसिंह जहागीरदार, के के पाटील, शरद मोरे,अजिंक्य माने पाटील ,,दीपक खराडे,,कृषी अधिकारी पूनम चव्हाण, डी एस गायकवाड, उद्योजक निवृत्ती गोदाजी,कुलदीप ढेकळे, काजल जाधव,व बी डी देशमुख,आदी मान्यवर उपस्थित होते.

कंपनीचे सीईओ सुनील लावंड यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून पार्थ कान्हा ऍग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनीकडून माळशिरस तालुक्याबरोबरच शेजारील पंढरपूर ,फलटण, इंदापूर आदी भागातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला, फळे व मधुमक्का (स्वीट कॉर्न ) घेऊन त्यावर प्रक्रिया करून पक्का माल आंतरराष्ट्रीय बाजारात विकून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देणार असल्याचे सांगितले तर हा तयार केलेल्या पक्का मालाची टिकवण क्षमता दोन वर्षापर्यंत असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

यावेळी युनीटी ऍग्रो चे सीईओ निवृत्ती गोदाजी यांनी पार्थ कान्हा फार्मर्स कंपनीकडून तयार होणारा संपूर्ण पक्का माल युनिटी ऍग्रो खरेदी करणार असल्याचे सांगितले तर कुलदीप ढेकळे यांनी शासनाच्या स्मार्ट योजनेबाबत माहिती दिली यावेळी शरद मोरे, के के पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांचा सन्मान धैर्यशील लावंड ,राजेंद्र लावंड ,अश्विन लावंड, संदीप लावड, शशिकांत लावंड, सुनीता लावंड, स्वाती लावंड, अनिता लावंड यांच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पी सी लावंड यांनी मानले .





