महाराष्ट्रमाळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा

विहिरीत पडलेल्या ६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या तांदुळवाडीच्या इरफान मुजावर यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते गौरव !​

भूमीपुत्र न्यूज

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे कार्य समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी असते, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी काढले. पंढरपूर-सातारा मार्गावरील तांदुळवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात विहिरीत उडी घेऊन ६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या तांदूळवाडी येथील धाडसी युवक इरफान मुजावर यांचा नुकताच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.​काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथून सिद्धनाथ देवाचे दर्शन घेऊन एक पिकअप गाडी पंढरपूर तालुक्यातील रांजणीकडे निघाली होती. पंढरपूर – सातारा मार्गावर माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीजवळ ही पिकअप रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये कोसळली. या दुर्दैवी अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता.​इरफान मुजावर यांचे अंगावर काटा आणणारे धाडस​हा अपघात घडला तेव्हा इरफान मुजावर हे स्वतःच्या गाडीने याच पिकअप वाहनाच्या पाठीमागून जात होते. डोळ्यांदेखत गाडी विहिरीत पडल्याचे पाहताच, त्यांनी कसलाही विचार न करता नागरिकांचे जीव वाचवण्याच्या उद्देशाने तात्काळ पावले उचलली.​त्यांनी सर्वप्रथम गावातील आपल्या सहकारी मित्रांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि मदतीसाठी बोलावले.​कोणाचीही वाट न पाहता त्यांनी स्वतः धाडसाने विहिरीत उडी घेतली.​विहिरीच्या पाण्यात बुडणाऱ्या एका ४ वर्षीय चिमुकलीसह तब्बल ६ जणांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.​​इरफान मुजावर यांच्या या अद्भूत धाडसाचे आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी इरफान मुजावर यांचा विशेष सत्कार केला.​या सन्मानाबद्दल इरफान मुजावर यांच्यावर माळशिरस तालुका आणि तांदुळवाडी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

​”जात-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे इरफान मुजावर यांचे कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी एका चिमुकलीसह ६ जणांना जीवदान दिले, त्यांच्या या शौर्याचा अभिमान वाटतो.”सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!