महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

माळशिरसमध्ये पकडलेल्या कंटेनर मध्ये सापडले 1 करोड रुपये

भूमिपुत्र न्यूज

माळशिरस पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने मोठी कारवाई केली असून या कारवाईमध्ये कंटेनर मध्ये एक करोड रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

शनिवार दि.6 जुलै रोजी 10 ते 12 लोकांनी आमची गाडी अडवलेली असून आम्हाला पोलीस मदत पाहीजे अशा संबंधीचा फोन 112 नंबर वर आला त्यावरुन पो कॉ.रोकडे सदर ठिकाणी गेले असता त्यांना वाहन नंबर ए पी 31 टी एच 8729 हे वाहन व त्यावर चालक असणारा बिजयकुमार पाल हा होता व त्याचा जोडीदार चालक रमेश कुमार पाल होता.ही गाडी अडवणारे अमर दादा तोरणे, सचिन मोहन पिसे,विशाल वेताळ खुडे रा.माळशिरस, रणजित दादा तोरणे रा.निमगाव म,शरद धनंजय गाडे रा.फलटन,सागर प्रकाश देवकते रा.वेळापुर ता माळशिरस, यशवंत बाजीराव देशमुख रा.माळशिरस,रणजित यशवंत मोहीते रा.खुडुस असे होते त्यांनी पोलीसांना सांगितले की, आम्ही गौरक्षक असून सदर वाहनामध्ये गोमांस वाहतुक होत असल्याची आम्हाला गोपनीय माहीती मिळालेली होती.सदर वाहन पो.कॉ.रोकडे यांनी माळशिरस पोलीस ठाणेस आणले.हे वाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे उपस्थितीत पोलीस ठाणे अंमलदार पो.ना.दत्तात्रय खरात, पो.हे.काँ बोंद्रे,पो.काँ.रोकडे,पो.काँ.वैभव माळी,पो.काँ बोराटे,पोहेकाँ राहुल रुपनवर यांचे उपस्थित वरील गोरक्षकांच्या साक्षीदार यांनी सदर वाहनामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी वाहन चेक करण्यासाठी व्हिडिओ शूटिंग चालू करून गोरक्षक साक्षीदार व पंच यांनी वाहन चालक यांचे समक्ष चेक केले.सदर वाहनात झिंगा (कोळंबी) मच्छीची ट्रे दिसत होते हे ट्रे चेक करीत असताना एका ट्रेमध्ये एक बॉक्स आढळून आला सदर बॉक्समध्ये चलनी नोटा असल्याचे दिसले त्यानंतर सदर चलनी नोटा लाईटचे उजेडात पोलीस निरीक्षक कक्षामध्ये पंच व गोरक्षक साक्षीदार तसेच वाहन चालक यांचे समक्ष चेक केले असता सदर बॉक्स मध्ये 500 रु दराच्या चलनी नोटा एका बंडलमध्ये 50 हजाराचे 05 बंडल असे 2,50,000/रु चे असे एकूण 40 बंडल एकुण 01 कोटी रुपये अंदाजे किंमत मिळून आले आहेत सदर कारवाईचा व्हिडिओ शूटिंग मध्ये पंचनामा करून सदर रक्कम एका कागदी बॉक्समध्ये सील करून ठेवली आहे.


सदर रकमेबाबत वाहन मालक यांना पोलिसांनी फोनद्वारे विचारणा केली असता त्यांनी याबाबत योग्य स्पष्टीकरण न दिल्याने पुढील कारवाई साठी आयकर विभाग यांच्याकडे रिपोर्ट पाठवण्यात आलेला आहे पुढील कारवाई आयकर विभाग करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!