मराठा आरक्षणाबाबत माळशिरस तालुक्यात एकाच ठिकाणी होणाऱ्या साखळी उपोषणाबाबत रविवारी निर्णय ?
भूमीपुत्र न्यूज
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले आमरण उपोषण मागे घेतले असले तरी संपूर्ण महाराष्ट्रभर होणारे साखळी उपोषण सुरू राहील असा आदेश दिल्याने माळशिरस तालुक्यात एकाच ठिकाणी साखळी उपोषण सुरू राहणार असल्याने यासंदर्भात नियोजन करण्यासाठी सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याची बैठक रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वा. कांतीलाल सांस्कृतिक भवन ,अकलूज या ठिकाणी आयोजित केली आहे या बैठकीसाठी तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी माळशिरस तालुक्यात 25 ते 30 गावात साखळी उपोषण सुरू होते तर 10 ते 12 गावांमध्ये आमरण उपोषण सुरू होते परंतु मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडल्यानंतर गावोगावी हे साखळी उपोषण करण्याऐवजी तालुक्याच्या वतीने एकाच ठिकाणी एकाच छताखाली माळशिरस तालुक्याचे साखळी उपोषण सुरू करण्याबाबत सकल मराठा समाजाने रविवारी बैठक बोलावली असून या बैठकीत 6 नोव्हेंबर 2023 पासून ते 24 डिसेंबर 2023 पर्यंत माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा समाज बांधव माळशिरस तालुक्याच्या वतीने एकाच ठिकाणी होणाऱ्या साखळी उपोषणात प्रत्येक दिवशी एक गाव सहभागी होईल कोणते गाव कोणत्या दिवशी सहभागी होईल याबाबत नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे या बैठकीसाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.