मनाचे आरोग्य सुधारण्याचे ब्रम्हाकुमारीज यांचे कार्य कौतुकास्पद/डॉ.एम.के.इनामदार
भूमीपुत्र न्यूज
आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आजारांबरोबरच मानसिक आरोग्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.अशा परिस्थितीत ब्रम्हाकुमारीज संस्थेच्या वतीने माणसाचे मनोबल व आत्मविश्वास तथा मानसिक आरोग्य वाढविण्याचे होत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.एम.के. इनामदार यांनी सांगीतले.
अकलूज येथील ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय शाखेच्या वतीने आयोजित “महाशिवरात्री पावन पर्व”च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पोलीस अधिकारी गणेश चौधरी,सुनिल फडे,विजय शिंदे,बी.के.डॉ.पावले भाई, संस्थेच्या संचालिका बी.के.शिवरात्री,बी.के.गोदावरी,बी.के.अनु,बी.के.प्रिती बहेनजी व ब्रम्हाकुमारीज परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी “विशेषता द्वारा विश्व कल्याणकारी बनने का संकल्प” या विषयावर बी.के शिवरात्री बहेनजींनी मार्गदर्शन केले.तर बी.के.अनु बहेनजींनी महाशिवरात्रीचे अध्यात्मिक रहस्य स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बी.के.गोदावरी बहेनजी यांनी मानले.