डॉ. अंजली कदम निमा वूमन फोरम अकलूजच्या नूतन अध्यक्षपदी
भूमीपुत्र न्यूज
संपूर्ण महाराष्ट्राभर महिला बी ए एम एस डॉक्टर यांच्यासाठी निमा वुमन फोरम कार्यरत असून या निमा वुमन फोरमच्या 54 व्या अकलूज शाखेची स्थापना झाली असून या शाखेच्या अध्यक्षपदी अकलूज येथील सुप्रसिद्ध डॉ. अंजली कदम यांची सर्वानुमते निवड झाली आहे या निमा वूमन फोरम अकलूजच्या शाखेचे उद्घाटन निमा महाराष्ट्र स्टेट शाखेचे अध्यक्ष डॉ. सुहास जाधव निमाचे सहसचिव डॉ. दत्तात्रय कोकाटे यांच्या उपस्थित झाले यावेळी व्यासपीठावर निमा विभागीय सचिव डॉ दत्तात्रय होनमाने, निमा संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष डॉ सुरेश व्यवहारे, पंढरपूरचे अध्यक्ष डॉ. किशोर बागडे, ,पंढरपूर विभागाच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी- कोल्हे, अकलूजचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम के इनामदार व माजी एम सी आय मेंबर डॉ. तानाजीराव कदम,डॉ मिलिंद गुळभीले,उपस्थित होते.
यावेळी निमा वूमन फोरमच्या इतर पदाधिकाऱ्यांच्याही निवडी करण्यात आल्या यामध्ये डॉ कविता पाटील ,डॉ. रूपाली पराडे -पाटील व डॉ योगिता निटवे यांची उपाध्यक्षपदी ,डॉ. विद्या एकतपुरे यांची सचिवपदी, डॉ. उर्मिला पाटील व डॉ. डिकोळे यांची सहसचिव पदी ,डॉ शुभदा पोटे यांची कोषाध्यक्षपदी, डॉ सुमित्रा कोकाटे यांची सह कोषाध्यक्षपदी आणि डॉ. अर्चना गवळी यांची प्रेस व पब्लिसिटी पदी निवड करण्यात आली यावेळी निमा संघटनेच्या वतीने प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम के इनामदार व माजी एमसीआय मेंबर डॉ. तानाजी कदम यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीतील दैदिप्यमान कामगिरीबद्दल जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी डॉ. विद्या एकतपुरे यांनी निमा वुमन फोरमच्या आगामी वर्षभरातील कार्यक्रमाची माहिती दिली तर डॉ एम पी मोरे ,डॉ. निशिगंधा माळी, डॉ. शिरीष रनवरे, डॉ सुहास जाधव यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ निंबाळकर तर आभार डॉ. स्वराली गांधी यांनी मानले.डॉ सुधीर पोफळे यांनी प्रास्ताविक केले.
नव्यानेच स्थापन झालेली अकलूजची निमा वुमन फोरम ही शाखा महिलांच्या बाबतीत अग्रक्रमाने काम करणारी राज्यातील क्रमांक एक ची शाखा असेल यामध्ये सहभागी असणाऱ्या डॉक्टर महिला या समाजकार्यात या अगोदरही एक पाऊल निश्चितच पुढे आहेत निमा वुमन फोरममुळे त्यांना अधिकची ताकद मिळेल यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व महिला डॉक्टर समाजामध्ये असणाऱ्या महिलांनाही त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक करण्याचे काम करतील
डॉ अंजली कदम, अध्यक्ष निमा वुमन फोरम अकलूज