माळशिरस तालुकाराजकिय

युवा सेनेचे वाढत्या महागाई विरोधात केंद्र व राज्य सरकार विरोधात अकलूज येथे आंदोलन

भूमीपुत्र न्यूज

बस हुई महंगाई की मार, नहीं चाहिये मोदी सरकार….फडणवीस -शिंदे भाई है, महाराष्ट्र मे महंगाई छाई है… अब की बार महंगाई की मार… मोदी सरकार हाय हाय… गॅस दरवाढीचा निषेध असो… अशा घोषणा देत आणि लाकडानी पेटवलेल्या चुलीवर भाकरी भाजत डाळ भात शिजवत अकलूज येथील शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गॅस दरवाढ व महागाई विरोधात राज्य व केंद्र सरकारचा निषेध करून आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख नामदेव वाघमारे,शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोनू पराडे पाटील ,शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख पुनमताई अभंगराव, युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे, शिवसेना अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे युवा सेना शहर प्रमुख शेखर खिलारे उपस्थित होते.

यावेळी बोलताना युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे म्हणाले की, 2014 साली गॅस 410 रुपये होते तेच दर 2023 ला 1140 रुपये झाला आहे केंद्र व राज्य सरकार या दोघांनीही महागाईने सामान्य जनतेचे हाल केले असून पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा दिला पुनम अभंगराव म्हणाल्या ,की महागाईने जनतेला पुन्हा चुली पेटवाव्या लागल्या आहेत. म्हणूनच आज आम्ही चुलीवरील भाकरी भाजून डाळ भात शिजवून आंदोलन छेडत आहोत.


शिवसेना उपजिल्हा प्रमुख नामदेव वाघमारे म्हणाले की मोदी सरकारने गॅस योजना राबवून घरघरात गॅस सिलेंडर दिल, मात्र त्याच गॅस द्वारे लूट करून सरकार तोंडातील घास हिरावून घेणार याची कल्पना जनतेला नव्हती.मात्र आम्ही सरकारच्या गळ्याचा फास आवळल्या शिवाय गप्प बसणार नाही. शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत म्हणाले की खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजपचे मोदी सरकारचे पितळ आज महागाईचा आगडोंब उसळल्याने उघडे पडले आहे. युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे म्हणाले की पेट्रोल, गॅस सिलेंडर व वीज यांच्या दरवाढ जनतेच्या सहनशीलते पलीकडची आहे. महागाईतून सरकारने शेतकरी आणि गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे. व्यापक स्वरूपात आंदोलन पेटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

यावेळी संगीता पवार ,डॉ राजश्री क्षिरसागर, मंजुळा धोडमीसे ,अनिता आसबे ,जयश्री इंगळे, पल्लवी साळुंखे, महादेव बंडगर ,उमेश जाधव, दत्ताभाऊ साळुंखे ,डाॅ निलेश कांबळे, दुर्वा अडके, गणेश बनकर, देवा लोखंडे ,मिलिंद मोरे जयेश पराडे,आण्णा पराडे,गणेश पराडे, किरण भांगे, पिंटू चव्हाण सुरज साठे,अर्जुन लोखंडे,सुजित रणदिवे,अजय नाईकनवरे,सागर लोखंडे सतिश कुलाळ,सुनिल मिसाळ,चेतन लोखंडे,अजय मिसाळ,अमर खंडागळे,गणेश काटे ,सचिन लोखंडे,पप्पु जाधव,पप्पु जगताप नानासाहेब बंडगर ,गोरख पवार, लाला मगर ,अनिल घाडगे, सुनिल कांबळे, मनोज जगताप, सूनका जाधव ,विकास दळवी, शंकर पाटील आदी युवा सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!