“युवा पिढीला जिजाऊंच्या संस्कारांची शिदोरी !” निमगाव येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भव्य कीर्तन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन

भूमीपुत्र न्यूज/नितीन मगर
राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘राजे संभाजी युवा प्रतिष्ठान’च्या वतीने निमगाव (म.) येथे भव्य ‘जिजाऊ जन्मोत्सव सोहळा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपणाऱ्या या महोत्सवाचे हे यंदाचे सातवे वर्ष असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचा जागर होणार आहे.या उत्सवामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मोहन (काका) पाटील महाराज सांगलीकर यांचा सुश्राव्य कीर्तन सोहळा.
राजमाता जिजाऊंच्या संस्कारांचा वारसा आणि स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार युवा पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या सोहळ्यामागचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:०० ते ८:३० या वेळेत संपन्न होणार आहे.कीर्तन सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविक आणि ग्रामस्थांसाठी ‘महाप्रसादाचे’ विशेष आयोजन करण्यात आले आहे.
हा संपूर्ण सोहळा किरण पाटील वस्ती, संभाजीनगर, निमगाव (म.), ता.माळशिरस येथे पार पडणार आहे.’राजे संभाजी युवा प्रतिष्ठान’च्या वतीने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.या प्रसंगी निमगाव आणि परिसरातील सर्व शिवप्रेमी, महिला, युवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




