महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

माविम सोलापूर जिल्हा कार्यालयाचा राज्यात द्वितीय क्रमांक; सिद्धेश्वर CMRC शेटफळला पुणे विभागातील उत्कृष्ट साधन केंद्राचा मान

भूमीपुत्र न्यूज

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या सन २०२५–२६ या वर्षाच्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे करण्यात आले. माविमच्या व्यवस्थापकीय संचालक मा.श्रीमती राजलक्ष्मी शहा (भा.प.से.) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.यावेळी महाव्यवस्थापक (प्रकल्प) श्री महेंद्र गमरे, महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) श्री अशोक फळणीतकर, व्यवस्थापक श्रीमती रूपा मिस्त्री, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती राखी मिराशी, व्यवस्थापक श्रीमती गौरी दोंदे तसेच मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांच्या सन २०२५–२६ मधील कामगिरीचा आढावा घेऊन मूल्यांकन करण्यात आले.

अधिक व्याप्ती (Heavy Loaded) प्रवर्गात माविम सोलापूर जिल्हा कार्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या प्रवर्गात अमरावती जिल्ह्याने प्रथम, तर वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांनी संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला.याचबरोबर, माविम सोलापूर अंतर्गत कार्यरत सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र (CMRC), शेटफळ, ता. मोहोळ याची पुणे विभागातील उत्कृष्ट साधन केंद्र म्हणून निवड करण्यात आली.या दोन्ही पुरस्कारांचे वितरण व्यवस्थापकीय संचालक मा. श्रीमती राजलक्ष्मी शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माविम सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या वतीने जिल्हा समन्वय अधिकारी श्री मन्सुर पटेल, विभागीय सल्लागार श्री विलास बच्चे, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार श्री सिद्धाराम माशाळे तसेच दीपक टेकाळे, परमेश्वर इंगळे आणि राजकुमार पवार यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्वीकारले.सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने उपाध्यक्षा श्रीमती संगीता सावंत, व्यवस्थापक श्री नितीन साठे आणि जिल्हा समन्वय अधिकारी श्री मन्सुर पटेल यांनी पुरस्कार स्वीकारला.

माविम सोलापूरची उल्लेखनीय कामगिरी

माविम सोलापूर जिल्हा कार्यालयामार्फत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत जिल्ह्यात ८,८५० महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून त्यामधून सुमारे ९० हजार महिलांचे संघटन झाले आहे.जिल्ह्यात २२ लोकसंचलित साधन केंद्रे (CMRC) कार्यरत असून त्यांच्यामार्फत महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.सन २०२५–२६ मध्ये या साधन केंद्रांमार्फत ३,१७७ बचत गटांना विविध बँकांद्वारे सुमारे १७२ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. तसेच ६५० महिलांना सुमारे ४.५ कोटी रुपयांचे वैयक्तिक व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देण्यात आले.याशिवाय, नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत ३४ उपप्रकल्प,SMART प्रकल्पांतर्गत १५ शेतकरी उत्पादक कंपन्या व १५ प्रकल्प,मॅग्नेट प्रकल्पांतर्गत १ उपप्रकल्प,तसेच वॉटर व GTM प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची दखल घेत माविम मुख्यालय, मुंबई यांनी माविम सोलापूर जिल्हा कार्यालयाची राज्यातील द्वितीय क्रमांकासाठी निवड केली.

सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश

या यशामागे माविम सोलापूर जिल्हा कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, तालुका अभियान कक्ष, जिल्ह्यातील सर्व लोकसंचलित साधन केंद्रांचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, कर्मचारी, CRP, पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच माविम मुख्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मोलाचे ठरले आहे. मन्सुर पटेल जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!