माळशिरस तालुकाराजकिय

निमगावचे माजी उपसरपंच नंदकुमार मगर पाटील यांचा उमेदवारी अर्ज माजी सरपंच आरती मगर यांच्या हस्ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सुपूर्द

भूमीपुत्र न्यूज

निमगाव ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 6 मधून सर्वसाधारण विभागातून निमगाव चे माजी उपसरपंच नंदकुमार मगर पाटील यांचा सन 2022 च्या निमगाव ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज गुरुवार दि 1 डिसेंबर रोजी निमगावच्या माजी सरपंच आरती मगर यांच्या व उमेदवार नंदकुमार मगर पाटील यांच्या हस्ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी विष्णुपंत मगर, विश्वनाथ मगर, विराज पाटील, राजू तोरणे ,विनायक तोरणे, तानाजी तोरणे ,माऊली तोरणे, शब्बीर मुलाणी, बाळासाहेब काळे ,अण्णा मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

निमगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता असून प्रभाग क्रमांक 6 मधून सर्वसाधारण विभागातून मल्लसम्राट व स म शंकराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक रावसाहेब मगर यांच्या पॅनल मधून उमेदवारी अर्ज कोण भरणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या परंतु अनेक शक्यतांना पूर्णविराम देत याच प्रभागातून मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार नंदकुमार मगर पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने या प्रभागातून कोण कोणाविरुद्ध लढणार ? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे 2 दिवस राहिलेले असताना 1 डिसेंबर 2022 पर्यंत निमगाव ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी फक्त 16 उमेदवारी अर्ज आले असून जनतेतून सरपंच पदासाठी एकमेव 1 अर्ज आला आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि 2 डिसेंबर रोजी 17 जागांसाठी व सरपंच पदाच्या जागेसाठी किती उमेदवारी अर्ज येणार ? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!