सज्जन जयवंत अवताडे यांचे निधन

भूमीपुत्र न्यूज
फळवणी ता माळशिरस येथील सज्जन जयवंत अवताडे यांचे शनिवार दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले ते हनुमान हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तांदुळवाडी चे माजी मुख्याध्यापक होते हनुमान विकास मंडळ संचलित, हनुमान हायस्कूलची स्थापना दिनांक 2 जुलै 1984 पासून 2015 पर्यंत प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले.

प्रशालेच्या गुणवत्तेसाठी व शिस्तप्रिय जीवनासाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक अविवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8.00वाजता कुंभार घाट, पंढरपूर येथे होणार आहे
“माजी मुख्याध्यापक कै. सज्जन जयवंत अवताडे यांच्या पवित्र स्मृतीस भूमिपुत्र न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली”




