महावितरणने शेतीपंपाची विज तोडली, झोपेचे सोंग घेणाऱ्या राजकर्त्यांना जाग कधी येणार ? संतप्त सवाल

भूमीपुत्र न्यूज
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर महावितरण कंपनीने विजतोडणी मोहीम हाती घेतली असून विज बील भरा अन्यथा विज तोडण्यात येईल असा तुघलकी फर्मान काढल आहे.निमगाव सह माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून वीज वितरण कंपनीने अचानक वीज बील भरण्याचे फर्मान काढले असून फक्त दोनच तास शेतीपंपाची वीज सोडण्यास सुरूवात केली आहे.ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर महावितरण कंपनीने अचानक वीज बंदचा निर्णय घेतल्याने हातातोंडाशी आलेली पिके जुळून जाणार आहेत मात्र मागील काळात शेतकऱ्यांचा कळवळा असणारे राजकर्ते मात्र मुग गिळून गप्प आहेत त्यामुळे हाताची घडी तोंडावर बोट अशी अवस्था त्यांची झालेली दिसून येत आहे

ऊस,केळी,कलिंगड,द्राक्षे,मका आदी पिकांना सध्या पाण्याची गरज असून ऐन भरात असताना पाणी न मिळाल्यास या पिकांचे मोठे नुकसान होण्याची होणार आहे माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली आज अकलूज येथील महावितरण कार्यालय येथे लोडशेडिंग व वीज तोडणी विरोधात आंदोलन करून निवेदन देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी भूमिपुत्र न्यूज शी बोलताना सांगितले. मात्र झोपेचे सोंग व शेतकऱ्यांचा कळवळा असणाऱ्या राजकर्त्यांना जाग कधी येणार ? असाही प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे




