कोळेगांव येथे विविध विकासकामांचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन

भूमीपुत्र न्यूज
कोळेगांव ता माळशिरस येथील ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांचे भूमीपूजन व उदघाटन सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.आ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या अंबिका देवी सभामंडप पायाभरणी,जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ग्रामदैवत श्री बिरोबा पालखी पत्रा शेडचे व ग्रामपंचायतिच्या 15 वित्त आयोग निधींतून भाजी मंडई बाजार कट्ट्याचे उदघाटन यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कोळेगाव येथील जेष्ठ नेते माजी उपसरपंच नागनाथ दुपडे,धनंजय दुपडे, सरपंच रजनी दुपडे, उपसरपंच रेश्मा सावंत,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन शहाजी सावंत, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी आपल्या समस्या तसेच भविष्यात गावासाठी अपेक्षित कामे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य धैर्यशील मोहिते पाटील यांना सांगितली.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळेगांव तलावात राजेवाडी तलावातील पाणी सोडण्याचे तसेच ओढ्यावर बंधारे बांधून देण्याचे आश्वासन यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी ग्रामस्थांना दिले तर कोळेगांव-बचेरी रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले असून अवघ्या दहा दिवसात रस्ता खचला आहे काम होऊन एक वर्ष होत आले तरी त्याची साईड पट्टी भरली नाही अशी तक्रार झाल्याने तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून या रस्त्याची ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करून सदर काम योग्य व नियमानुसार करण्याच्या सूचना धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिल्या.




