माळशिरस तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताहाचे आयोजन

भूमीपुत्र न्यूज
महसूल दिनानिमित्त माळशिरस तहसील कार्यालयाच्या वतीने मंगळवार दि 1 ऑगस्ट ते सोमवार दि 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताह साजरा केला असून त्या अंतर्गत तहसील कार्यालयाच्या वतीने प्रत्येक दिवशी समाजातील विविध वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती आज तहसील कार्यालय माळशिरस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी पत्रकारांना दिली.यावेळी निवासी नायब तहसीलदार अशिष सानप, अमोल कदम उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना तहसीलदार सुरेश शेजुळ म्हणाले की, मंगळवार दि 1ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जाणारा असून या अंतर्गत महसूल विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे बुधवार दि 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद, ३ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा ,4 ऑगस्ट रोजी जनसंवाद ,5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, 6ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी संवाद आणि 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभ आयोजित करण्यात येणार आहे याचबरोबर या सप्ताहात महसूल विभागाशी निगडित विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, शेतीचे अभिलेख अद्यावत करणे, नैसर्गिक आपत्तीने बाधित व्यक्तींना मदत उपलब्ध करून देणे, आजी-माजी सैनिकांच्या शेतीविषयक अडचणी सोडविणे यासारखे विविध उपक्रम या माळशिरस तहसील कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणार आहेत यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असेही आवाहन माळशिरस तहसीलदार यांनी केले आहे .




