चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्याच्या 3500 मे.टन क्षमतेच्या विस्तारीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ 20 मार्च रोजी
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट क्रमांक 1, या साखर कारखान्याच्या 3500 मे टन गाळप क्षमतेच्या विस्तारीकरण प्रकल्पाचा ,20 मेगावॅट सह वीजनिर्मिती प्रकल्पाचा आणि 150 के एल पी डी इथेनॉल डिस्टिलरी प्रकल्प भूमिपूजन समारंभ सोहळा सोमवार दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 11 वा कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी केले आहे .
अल्पावधीतच माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला चांदापुरी येथील ओंकार साखर कारखाना हा चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील व संचालक रेखाताई बोत्रे पाटील यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा कारखाना सुरू केला असून सन 2020-21 व 21- 22 हे या 2 यशस्वी गाळप हंगामानंतर कारखाना परिसरात असणाऱ्या उसाची नोंद पाहता कारखान्याची गाळप क्षमता वाढवावी अशी शेतकऱ्यांनी चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्याकडे मागणी केली असता शेतकऱ्यांच्या हित डोळ्यापुढे ठेवून चेअरमन बोत्रे पाटील यांनी सर्वांना विश्वासात घेऊन या कारखान्याची गाळप क्षमता 3500 मे टन करण्याचा निर्णय घेतला असून याचबरोबर 20 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प आणि 150 के एल पी डी इथेनॉल डीसलरी प्रकल्प भूमिपूजन समारंभ चांदापुरीचे सरपंच जयवंत सूळ यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन बाबुराव दादासाहेब बोत्रे पाटील हे राहणार आहेत तरी परिसरातील शेतकऱ्यांसह सर्व हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .