असे होणार माळशिरस तालुक्यात साखळी उपोषण ?
सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने पुढाऱ्यांना गावबंदी व साखळी उपोषणाची सुरुवात
भूमीपुत्र न्यूज
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार माळशिरस तालुक्यात जुन्या 11 जिल्हा परिषद गटात सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार असून याबाबत सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने स्पष्ट भूमिका मांडून साखळी उपोषणाबाबत उद्बोधन करण्यात आले आहे.
सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार सर्व मराठा समाज बांधवांना कळविण्यात येते की,मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आवाहना नुसार व पुढील आदेश येईपर्यंत माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद गटनिहाय साखळी उपोषण करण्याचे तसेच राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी चे नियोजन सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
यानुसारदहिगाव,नातेपुते,माळशिरस,मांडवे,अकलूज,शंकरनगर,महाळुंग,वेळापूर,निमगाव व पिलीव या जिल्हा परिषद गटात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
नातेपुते ,माळशिरस, अकलूज, महाळुंग या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू होणार आहे .यापैकी महाळुंग या जुन्या जिल्हा परिषद गटात 25/4 तर वेळापूर ,तांदूळवाडी व निमगाव या ठिकाणी साखळी उपोषण सुरू झाले असून शनिवार दि 28 ऑक्टोबर पासून अकलूज , शंकरनगर या दोन्ही जिल्हा परिषद गटाचे एकत्रित अकलूज प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू होणार आहे याचबरोबर नातेपुते, दहिगाव या जिल्हा परिषद गटातही शनिवार दि.28 ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त ज्यांना ज्या गावात साखळी उपोषण सुरू करावयाचे आहे ते साखळी उपोषण करू शकतात यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला रीतसर पत्र द्यावे.
साखळी उपोषण म्हणजे नेमकं काय?
साखळी उपोषण हे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत करावे साखळी उपोषण करीत असताना उपोषणाला बसणाऱ्या व्यक्तींनी आलटून पालटून बसावे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही पदार्थांचे सेवन करता येणार नाही.उपोषणाला बसण्या अगोदर संबंधित पोलीस स्टेशनला पत्र द्यावे उपोषणाच्या ठिकाणी आरक्षणाबाबत योग्य ती भाषणे व ज्ञानार्जन व्हावे.