आ.राम सातपुते यांचा निमगाव येथे सन्मान,पाच लाखाचे ऑपरेशन केले होते मोफत

भूमीपुत्र न्यूज
निमगाव ता माळशिरस येथील सोजर शंकर मगर यांचे हृदयाचे ऑपरेशन मोफत करून दिल्याबद्दल आ राम सातपुते यांचा सन्मान करण्यात आला आ सातपुते हे माळशिरस तालुका मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष व पत्रकार निनाद पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी आले होते यावेळी त्यांचा सन्मान रमेश मगर व पत्रकार नितीन मगर यांच्या हस्ते करण्यात आला सोजर मगर यांना हदयाचा झडपेचा आजार होता त्यांना अकलूज येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले होते व या ऑपरेशन साठी सुमारे 4 ते 5 लाख रूपये खर्च सांगितला होता परंतु मगर यांची आर्थिक परीस्थिती बेताची असल्याने त्यांना एवढा खर्च करणे शक्य नव्हते.

माळशिरसचे आ राम सातपुते हे तालुक्यातील गरीब रुग्णांवर पुण्यातील रूग्णालयात मोफत उपचार करून देतात अशी माहिती मगर यांच्या कुटुंबियांना मिळाली यानंतर सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सहप्रभारी के के पाटील यांच्या सहकार्याने आ.सातपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तत्काळ सह्याद्री हॉस्पिटल येथे रुग्णास दाखल करण्यास सांगितले व या हॉस्पिटल मध्ये सोजर मगर यांचे ऑपरेशन मोफत केले.आमदार सातपुते यांनी मगर यांची परीस्थिती हलाखीची असल्याने ऑपरेशन मोफत करून दिल्याबद्दल आ राम सातपुते यांचा मगर यांच्या कुटुंबियांनी सन्मान केला.
यावेळी निमगाव चे उपसरपंच नंदकुमार पाटील,पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख,किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर,निनाद पाटील,युवा उद्योजक मुबारक कोरबू, विश्वनाथ मगर, नंदकुमार मगर पाटील, शिवाजी मगर आदि मान्यवर उपस्थित होते




