युवा सेनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी पिलीवचे सुभाष काकडे
भूमीपुत्र न्यूज
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या युवा सेनेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी पिलीव ता माळशिरस येथील सुभाष काकडे यांची निवड करण्यात आली असून या निवडी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे व युवा सेना राज्य विस्तारक उत्तम आयवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे याचबरोबर दत्ता साळुंखे (कोंडबावी) , रुपेश लाळगे (नातेपुते) दूर्वा आडके (माळशिरस) यांची युवा सेना उपतालुकाप्रमुख तर गणेश बनकर (बागेवाडी )यांची माळशिरस तालुका सोशल मीडिया समन्वयक म्हणून नेमणूक केली असून या नेमणुका दै. सामनाच्या 14 जानेवारीच्या अंकातून जाहीर करण्यात आल्या आहेत.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसेना ,उद्धव बाळासाहेब ठाकरे माळशिरस तालुक्याच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून नेमणुका झालेले सर्वच पदाधिकारी हे गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून शिवसेनेसी निगडित आहेत माळशिरस तालुका युवा सेना प्रमुख म्हणून यापूर्वी संगम ता माळशिरस येथील गणेश इंगळे यांनी काम पाहिले होते परंतु त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर माळशिरस तालुक्याच्या युवा सेनेचे तालुका अध्यक्ष पद रिक्त होते अखेर 14 जानेवारी 2023 रोजी माळशिरस तालुका युवा सेना तालुकाप्रमुख म्हणून पिलीवचे सुभाष काकडे यांची निवड झाली आहे शिवसेनेत झालेल्या बंडानंतर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जोमाने काम तर करावेच लागणार आहे परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करून जनतेची सेवा करू व पक्ष हिताच्या कामाला प्राधान्य देऊ असे आश्वासन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिले .