शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला,क्रीडा,सांस्कृतिक या गुणांचा विकास महत्वाचा – स्वरूपाराणी मोहिते-पाटील

भूमीपुत्र न्यूज
पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे व त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला,क्रीडा,सांस्कृतिक या गुणांचा विकास महत्वाचा आहे असे विचार शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेत खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी अक्षता सावंत व गौरी पराडे यांनी क्रिकेट स्पर्धेत,ईशा घाडगे व ईश्वरी घाडगे यांनी बास्केटबॉलमध्ये,अक्षरा निकम व वैदेही दावणे यांनी वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश मिळविले त्याबद्दल या खेळाडूंचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर१४ वर्षीय वयोगट व १७ वर्षीय वयोगटातील मुलींनी फुटबॉल स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल या दोन्ही संघातील खेळाडूंचा सत्कार स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या सर्व खेळाडूंना विद्यालयाचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक यशवंत माने-देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी सर्व खेळाडूंचे पालक,मुख्याध्यापक कलाप्पा सूर्यवंशी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत माने-देशमुख यांनी केले,सूत्रसंचालन राजश्री कणबुर यांनी केले तर रोहित माने यांनी आभार मानले.




