आ. राम सातपुते यांचा करिष्मा; 23 किलोमीटरसाठी 24 कोटी रुपये मंजूर

भूमीपुत्र न्यूज
माळशिरसचे आ. राम सातपुते यांनी माळशिरस ते पिलीव या 23 किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 24 कोटी मंजूर करून घेतल्याने कायमच रहदारीसाठी अडचणीचा ठरलेला हा रस्ता येत्या वर्षभरात पूर्णपणे दुरुस्त होणार असल्याने आ राम सातपुते यांनी आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी खेचण्याच्या पुन्हा एकदा करिष्मा दाखविल्याने त्यांच्या या करिष्म्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .

आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्यात माळशिरसचे आ. राम सातपुते हे नेहमीच अग्रभागी राहिलेले आहेत सातारा पंढरपूर रस्त्यावरील व माळशिरस तालुक्याच्या दक्षिणेकडील महत्त्वपूर्ण असणाऱ्या पिलीव गावाकडे माळशिरसहून तरंगफळ मार्गे जाणारा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा होता यामुळे या भागातून ये जा करीत असताना लोकांची ससेहोलपट होत होती अनेकदा या रस्त्यांवर अपघातही झाले होते अशा अनेक तक्रारी आ राम सातपुते यांच्याकडे गतवर्षी आल्या होत्या.
या अनुषंगाने गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ राम सातपुते यांनी या रस्त्यासाठी 14 कोटी रुपये मंजूर करून घेतले होते परंतु हा निधी कमी पडत होता व या 23 किलोमीटर रस्त्यापैकी केवळ 15 ते 16 किलोमीटरचा रस्ता दुरुस्त होत होता यामुळे या भागातील लोकांनी पुन्हा एकदा आ राम सातपुते यांच्याकडे हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त करण्याची मागणी केली आणि आ राम सातपुते यांनी नागपूर येथे सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा 10 कोटी रुपये या रस्त्यासाठी वाढीव निधी मंजूर करून घेतला असे एकूण 23 किलोमीटरसाठी 24 कोटी रुपये मंजूर झाल्याने झाले आहेत यामुळे पिलीव ,तरंगफळ चांदापुरी, पठाणवस्ती गारवड ,बचेरी ,शिंगोर्णी ,काळमवाडी सुळेवाडी सह अन्य भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे .
माळशिरस पिलीव या 23 की मी च्या रस्त्यासाठी प्रथमता 14 कोटी रुपये मंजूर झाले होते परंतु या निधीत हा रस्ता फक्त चांदापुरी पर्यंतच करता येत होता यामध्ये आ राम सातपुते यांनी 10 कोटी रुपयांचा वाढीव निधी दिल्याने हा रस्ता पूर्णपणे होणार असून फेब्रुवारी 2023 मध्ये या कामास सुरुवात होऊन हे काम एका वर्षभरात पूर्ण होणार आहे .
निरंजन तेलंग ,कार्यकारी अभियंता सा बां विभाग अकलूज




