माळशिरस तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज
भूमीपुत्र न्यूज
ऑक्टोबर 2022 व डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या माळशिरस तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होत या 34 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण 110011 मतदार मतदान करणार आहेत आहेत या अनुषंगाने माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीसाठी संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे निवडणूक कामी नियुक्त अधिकारी, कर्मचारी ,निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या सर्वांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
18 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी 34 ग्रामपंचायतीसाठी एकूण 159 मतदान केंद्र असणार आहेत . केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी , शिपाई, कर्मचारी, दहा टक्के वाढीव कर्मचारी असे 875 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूका करण्यात आल्या आहेत सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता 3 प्रशिक्षणे घेण्यात आली असून संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायत मतदान केंद्र म्हणून निमगाव, वेळापूर ,काळमवाडी, तरंगफळ, मेदड, या गावांची नोंद प्रशासनाकडे आहे . याचबरोबर या मतदानासाठी मतदान यंत्रे, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, बसेस ,क्रुझर, जीप यांचीही व्यवस्था करण्यात आली.
मतदान यंत्रे निवडणूक कामी 15 डिसेंबर रोजी नवीन शासकीय धान्य गोदाम म्हसवड रोड, माळशिरस येथे तयार करण्यात आली आहेत.
मतदान साहित्य वाटप आज 17 डिसेंबर रोजी याच ठिकाणी करण्यात येणार आहे मतदान संपल्यानंतर मतदान साहित्य जमा करूनही याच ठिकाणी घेण्यात येणार आहे आहे मतदानापूर्वी व मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रे ठेवणे कामे सुरक्षा कक्षही याच ठिकाणी असणार आहे याचबरोबर मतमोजणी देखील याच ठिकाणी होणार आहे स्ट्रॉंग रूम मध्ये तसेच स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सभोवताली सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून पोलीस स्टेशन निहाय वेगवेगळे सेक्टर तयार करण्यात आलेले आहेत जेणेकरून सुरक्षा व्यवस्था तसेच मतदान भयमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत .