नोकरदार नको उद्योजक व्हा/ ॲड एम एम मगर

भूमीपुत्र न्यूज
‘युवकांचा’ विकास हाच आपला ध्यास” यानुसार युवकांनी नोकरीच्या मागे न लागता शासनाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या योजना व त्यापासून नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणारे सहकार्य याची सांगड घालून ग्रामीण भागात छोटे-मोठे व्यवसाय सुरू करावेत व इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असे आवाहन आपला युवक शेतकरी फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड एम एम मगर यांनी माळशिरस येथे शामराव हांडे यांच्या आपला युवक शेतकरी फोरमच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या फॅब्रिकेशन व्यवसायाच्या उदघाटन प्रसंगी सांगितले.

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत शामराव हांडे या युवकाने आपला युवक शेतकरी फोरमच्या माध्यमातून नवीन फेब्रिकेशन चा व्यवसाय सुरू केला याप्रसंगी ॲड एम एम मगर बोलत होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, युवकांनी नोकरी देणारे उद्योग सुरु केले पाहिजेत आजचा युवक नोकरी मागणारा नसावा पण नोकरी देणारा असावा शामराव हांडे यांना गरज असेल तेवढी शक्य ती मदत, मार्गदर्शन करण्याची भुमिका आपला युवक शेतकरी फोरमच्या माध्यमातून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उदघाटन प्रसंगी मोटेवाडी सरपंच सतिश मोटे,ग्रा पं सदस्य महादेव मोटे, भानुदास देवकाते,सचिन हांडे,दादा सरगर,महादेव हांडे,रामभाऊ मस्के,वामन वाघमोडे,विजय खराडे,उमेश घोडके,सागर सरगर, इकबाल आतार,शेखर पाटील, सलिम पठाण,महेश मंजुळे, आदी युवक फोरमचे सदस्य ,संघटक व उद्योजक हजर होते.
यावेळी माळशिरस व परिसरातील डाॅक्टर,वकिल, इंजिनिअर, व्यापारी,शेतकरी, नोकरदार, बॅंक अधिकारी अशा विविध मान्यवर व्यक्तींनी ‘जंजिरा बंगला ‘माळशिरस येथे “तिळगुळ देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या,गोड बोलण्या बरोबर वागणं ही गोड हवं आणि आरोग्य व कृती ही गोड हवी ज्यातुन आनंद समाधान मिळेल अशा पध्दतीचा संदेश आपला युवक शेतकरी फोरमच्या माध्यमातून दिला.




