महाराष्ट्रमाळशिरस तालुका

सोन्याची गदा मिळविणाऱ्या पै. महेंद्र गायकवाडचा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सन्मान

भूमीपुत्र न्यूज

नगर येथे शिवराय केसरी स्पर्धेच्या माध्यमातून देशात प्रथमच कुस्तीच्या इतिहासात अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस म्हणून जिंकणाऱ्या पै महेंद्र गायकवाड याचा सन्मान महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते अकलूज येथे करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे चे वस्ताद गोविंद पवार ,जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब इनामदार ,अण्णासाहेब शिंदे, पिंटू पवार ,विकास शिंदे ,फिरोज देशमुख यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या धर्तीवर अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी नगर येथे 20 एप्रिल ते 23 एप्रिल 2023 या कालावधीत छत्रपती शिवराय केसरी या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत पै सिकंदर शेख ,माऊली कोकाटे ,शिवराज राक्षे, हर्षल सदगीर, सुदर्शन खोतकर आदी नामवंत पैलवानांनी आपला सहभाग दाखविला होता माती आणि मॅट या दोन्ही विभागातून या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या पै महेंद्र गायकवाड विरुद्ध पै शिवराज राक्षे या दोन्ही मल्लांमधील अंतिम लढत माती विभागात पहावयास मिळाली अंतिम लढतीची कुस्ती सुरू असताना पै शिवराज राक्षे जखमी झाल्याने पै महेंद्र गायकवाड यास विजयी घोषित करण्यात आले .

संपूर्ण राज्यातील जिल्हा तालीम संघातील पैलवानांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता या स्पर्धेत सोलापूर जिल्हा तालीम संघाला सांघिक विजेतेपद मिळाले असून पै महेंद्र गायकवाड याचे वस्ताद गोविंद पवार हे आहेत देशात प्रथमच शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्या पैलवानास सोन्याची गदा देण्याची सुरुवात नगर जिल्हा तालीम संघाने केली आहे देशातील पहिल्या सोन्याचा गदेचा मानकरी होण्याचा मान पै महेंद्र गायकवाड यास मिळाला आहे याबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष व सोलापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे एक युवक असून स्वतःही ते उत्तम पैलवान आहेत .यामुळे राज्यासह जिल्ह्यात कुस्तीला मिळालेले गतवैभव डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाने व कल्पकतेतून दिसून येत आहे. डॉ धवलसिंह मोहिते पाटील हे नेहमीच राज्यातील पैलवानांना आश्रय देऊन मदत करीत असतात. सोलापूर जिल्ह्याला मिळालेले सांघिक विजेतेपद हे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनामुळेच मिळालेले आहे .
पै गोविंद पवार ,वस्ताद आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल केंद्र पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!