माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या सन 2023 च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न

भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या सन 2023 च्या नूतन दिनदर्शिकेचा दिमाखदार प्रकाशन सोहळा शुक्रवार दि. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वा तहसील कार्यालय माळशिरस येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लक्ष्मण डाके,गटविकास अधिकारी विनायक गुळवे ,नायब तहसीलदार तुषार देशमुख ,आशिष सानप, अकलूजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर ,माळशिरसचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहाय्यक निबंधक एस आर पटणे, वनपरिक्षेत्र अधिकारी साळुंखे,
माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी अध्यक्ष निनाद पाटील यांनी करून माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या गेल्या पाच वर्षातील सामाजिक उपक्रमांची माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले तर उपस्थित मान्यवरांचा सन्मान माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख म्हणाले की,
माळशिरसचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,
अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या कामाचा गुणगौरव करताना म्हणाले की,
यावेळी माळशिरस येथील दै सकाळचे जेष्ठ पत्रकार ग.ह.वाघंबरे सर यांनी आपल्या आईच्या कै. जनाबाई वाघंबरे यांच्या स्मरणार्थ सन 2023 मध्ये इयत्ता दहावी मध्ये सर्वात पहिली येणाऱ्या माळशिरस तालुक्यातील मुलीला 1001/- रुपयांचे रोख रकमेचे पारितोषिक माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव दिनेश माने देशमुख यांनी तर आभार सहसचिव बंडू पालवे यांनी मानले.




