समाधान काळे -पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव पाटी येथे भव्य पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धा
भूमीपुत्र न्यूज
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते समाधान काळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अजित भैया बोरकर मित्र परिवाराच्या वतीने शनिवार दि 31 डिसेंबर 2022 व रविवार 1 जानेवारी 2023 रोजी असे दोन दिवसीय भव्य पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन निमगाव पाटी येथे करण्यात आले असल्याची माहिती अजित भैया बोरकर मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली.
शनिवार 31 डिसेंबर व रविवार 1 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वा सुरू होणाऱ्या या स्पर्धा सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सुरू राहतील या स्पर्धेत विजेत्या होणाऱ्या संघास प्रथम पारितोषिक 11,111/- हे फलटण – पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड सोमनाथ वाघमोडे यांच्यावतीने देण्यात येणार आहे .द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रक्कम रुपये 7777/- रुपये एवढे असून हे पारितोषिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस विधानसभा प्रमुख व पिसेवाडी ग्रामपंचायतचे नूतन ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक हे 5555/- रुपयाचे असून स्वरा दूध संकलन केंद्राचे चेअरमन प्रशांत शहाजी काळे यांच्या वतीने देण्यात येणार आहे तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक हे 2222/- रुपयांचे असून हे बक्षीस ॲड सिताराम झंजे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघास संयोजन समितीच्या वतीने मोफत बॉल देण्यात येणार असून संघास प्रवेश फी म्हणून रक्कम रुपये 500/- आकारले जाईल.
या स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल ,ज्येष्ठ नेते मगन काळे, मराठा सेवा संघाचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष निनाद पाटील ,डॉ. सचिन शेंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख श्रीनिवास कदम पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख हे राहणार असून या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रेमकुमार चौगुले 89 99 98 75 53, अहिल पठाण 95 61 17 71 36, विजय वाघमारे 99 60 10 70 09, नामदेव मदने 83 90 40 76 09, सचिन बोरकर 73 50 57 66 88 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेतील प्रत्येक सामना हा पाच षटकांचा राहील ,प्रत्येक संघात 9 खेळाडू राहतील ,सामने बाद पद्धतीने राहतील ,पंचांचा निर्णय अंतिम राहील या सामन्यासाठी संयोजन समिती म्हणून विठ्ठल (आप्पा )जाधव, अच्युतराव काळे, सागर काळे ,धवल काळे, सचिन बोरकर, सागर झंजे ,तेजस भाकरे ,साधू राऊत, पै. विक्रांत काळे, अजित काळे ,अक्षय काळे, राजवर्धन काळे, तन्मय काळे, रामचंद्र पवार, यल्लाप्पा चौगुले, शंकर जाधव, विलास जाधव ,रामराज वाघमोडे, प्रकाश घोगरे ,किशोर गोरवे ,रणजीत वगैरे, मनोज गाडे ,अजिनाथ पंडित, सागर काळे ,स्वप्नील बोरकर हे असतील.