जागतिक किडनी दिन व कै. नंदकुमार देवडीकर यांच्या जयंतीनिमित्त अकलूज आणि परिसरातील पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी
भूमीपुत्र न्यूज
जागतिक किडनी दिन व अकलूज येथील वैद्यकीय क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व दिवंगत डॉ नंदकुमार देवडीकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दि 9 मार्च रोजी सकाळी 9 वा देवडीकर हॉस्पिटल, अकलूज येथे पत्रकार बांधवांची मोफत किडनी तपासणी शिबिर आयोजित केले असल्याची माहिती डॉ श्रीकांत देवडीकर यांनी दिली.
सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून स्वतःची ससेहोलपट करून पत्रकार बांधव समाजाच्या हितासाठी त्यांच्या समस्या शासन दरबारी पोहचविण्यासाठी आहोरात्र कष्ट घेणारे पत्रकार बांधव यांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.वेगवान आयुष्यात आणि धकाधकीच्या वातावरणात बातमीसाठी सदैव तत्पर राहणे व यासाठी करावा लागणारा संघर्ष आहोरात्र बातमीला चालना देऊन माणुसकीच्या शत्रू संगे लढणारी लेखणी झुंजार असते आणि या लेखणीचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे या भूमिकेतून डॉ श्रीकांत देवडीकर यांनी पत्रकारांची मोफत किडनी तपासणी शिबिर आयोजित करून पत्रकारांप्रती आपला आदर व्यक्त केला आहे .
अतुट आत्मविश्वासाच्या बळावर किडनी विकाराने ग्रस्त आणि त्रस्त झालेल्या रुग्णांना यमसदनातून सुखरूप बाहेर काढून आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वैद्यकीय क्षेत्रात आविष्कार घडवणारे अकलूज येथील डॉ. श्रीकांत देवडीकर हे अकलूज आणि परिसरातील पत्रकारांसाठी मोफत किडनी तपासणी शिबिर आयोजित करीत असल्याचे कार्य कौतुकास्पद आहे .