माळशिरस तालुकाराजकीयसोलापूर जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी जयसिंह मोहिते पाटील की.. स्वरूपाराणी मोहिते पाटील ?

व्हाईस चेअरमन पदी शंकरराव माने देशमुख की.. रावसाहेब मगर ?

भूमीपुत्र न्यूज

अकलूज, शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून सोमवार दि 22 मे 2023 रोजी नूतन निवड झालेल्या संचालकांची बैठक आयोजित केली असून या बैठकीकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून या बैठकीत कारखान्याच्या चेअरमन पदी नक्की कोणाची निवड होणार ? याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत चेअरमन पदी पुनश्च एकदा जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळ दादा यांची निवड होणार की, त्यांच्या कन्या युवा महिला नेतृत्व स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे चेअरमन पदाची जबाबदारी बाळ दादा सोपविणार का ? अशीही चर्चा सुरू आहे .

याचबरोबर या कारखान्याच्या व्हॉइस चेअरमनपदी गेल्या अनेक वर्षापासून संचालक पदाची धुरा सांभाळणारे वेळापूर (शेरी) येथील अनुभवी संचालक शंकरराव माने देशमुख यांची वर्णी लागणार की, निमगाव मगराचे येथील मोहिते पाटील परिवाराशी कायम निष्ठेने काम करणारे मल्लसम्राट पै. रावसाहेब मगर यांना व्हाईस चेअरमन पदाची संधी मिळणार ? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे . यापूर्वीही निमगाव मगर येथील कै नानासाहेब विठोबा मगर यांना सहकार महर्षी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी काम करण्याची संधी मिळाली होती कै नानासाहेब मगर हे मल्लसम्राट पै रावसाहेब मगर यांचे ज्येष्ठ बंधू होते त्यांच्या निधनानंतर मलसम्राट पै रावसाहेब मगर यांनी सहकार महर्षी साखर कारखान्याच्या संचालक पदाची धुरा सांभाळली होती यामुळे निष्ठेने काम करणाऱ्या रावसाहेब मगर यांना व्हाईस चेअरमन पदाची संधी मिळेल असाही आशावाद व्यक्त केला जात आहे .

जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या या साखर कारखान्यावर स्थापनेपासूनच मोहिते पाटील परिवाराचे एक हाती वर्चस्व राहिलेले आहे यावेळी झालेली पंचवार्षिक निवडणूकही बिनविरोध झाली असून कारखान्याने सन 22-23 या गाळप हंगामात जवळपास 10 लाख 50 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे या साखर कारखान्याच्या चेअरमन पदी महिला युवा प्रतिनिधी म्हणून प्रथमच स्वरूपाराणी मोहिते पाटील यांची वर्णी लागेल का ? का पुन्हा एकदा दोन वर्षासाठी जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळ दादा हे कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळतील व यानंतर कन्या स्वरूपाराणी मोहिते पाटील यांना संधी देतील असेही बोलले जात आहे यामुळे सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी जयसिंह मोहिते पाटील की स्वरूपा राणी मोहिते पाटील यांची निवड होणार ? तर व्हाईस चेअरमन पदी वेळापूर येथील शंकराव माने देशमुख की, निमगाव मगर येथील मल्लसम्राट पै. रावसाहेब मगर यांची वर्णी लागणार हे संचालक मंडळाच्या बैठकीनंतरच समजणार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!