उत्तम जानकर यांच्या जातीच्या दाखल्याबाबत सर्वोच्च न्यायालयात 17 फेब्रुवारी रोजी सुनावणी / संकल्प डोळस
भूमीपत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या हिंदू खाटीक या जातीच्या दाखल्याची सत्यता सुनावणी शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 रोजी मा सर्वोच्च न्यायालयात होणार असल्याची माहिती संकल्प हनुमंतराव डोळस यांनी भूमिपुत्र न्यूज शी अकलूज येथे बोलताना दिली गेल्या अनेक वर्षापासून वेळापूर येथील रहिवाशी असणारे व माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी काढलेल्या हिंदू खाटीक या जातीच्या दाखल्याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात होते मात्र पुन्हा एकदा मा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे हा जातीचा दाखला चर्चेत आला आहे.
यावेळी माहिती देताना संकल्प डोळस यांनी सांगितले की, सन 2007 साली उत्तम जानकर यांनी प्रांत कार्यालयाकडून बनावट कागदपत्रे सादर करून हिंदू खाटीक जातीचा दाखला मिळविला व सन 2009 ची विधानसभा निवडणूक लढवली तत्कालीन आ हनुमंत डोळस यांनी सोलापूर जात पडताळणी समिती समोर या दाखल्याच्या विरोधात दाद मागितली व हा दाखला बनावट कागदपत्रे सादर करून मिळविला आहे असा युक्तिवाद केला तो युक्तिवाद ग्राह्य करून सोलापूर येथील जात पडताळणी समितीने हा दाखला रद्द केला यामुळे सन 2014 च्या विधानसभा निवडणुक अर्ज छाननीत जानकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला यानंतर जानकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली व पुन्हा जानकर यांचा दाखला न्यायालयाने ग्राह्य धरला यामुळे जानकर यांना 2019 ची विधानसभा निवडणूक लढविता आली .
यानंतर दिवंगत आ हनुमंत डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात स्पेशल लिव पिटीशन दाखल केली सर्वोच्च न्यायालयाने ही स्पेशल लिव पिटीशन दाखल करून घेत उत्तम जानकर यांच्या हिंदू खाटीक या जातीच्या दाखल्याबाबत शुक्रवार दि 17 फेब्रुवारी रोजी पुन्हा सुनावणी ठेवली आहे यामुळे उत्तम जानकर यांच्या हिंदू खाटीक या दाखल्याबाबत काय होणार? याबाबत सर्वत्र चर्चा होत आहेत उत्तम जानकर यांच्या हिंदू खाटीक या दाखल्याबाबत अनुसूचित जाती जमाती बचाव समिती माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूजच्या प्रांत कार्यालयावर गुरुवार दि 16 रोजी जन आक्रोश मोर्चाही काढण्यात येणार आहे यामुळे जानकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने आमचा दाखला ग्राह्य धरला आहे अशी चुकीची माहिती देत न्यायालयाचा अवमान करून जनतेची दिशाभूल करीत आहेत अशीही माहिती यावेळी संकल्प डोळस यांनी दिली .