माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचा मंगळवार दि 26 डिसेंबर रोजी प्रकाशन सोहळा;शालेय विद्यार्थ्यांना 5 हजार वह्यांचे वाटप
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या सन 2024 च्या नूतन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. अकलूजचे प्रांताधिकारी नामदेव टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती कार्यालय माळशिरस येथे संपन्न होणार असल्याची माहिती माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष शाहरुख मुलाणी,सचिव दिनेश माने देशमुख,खजिनदार नितीन मगर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षी नूतन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केली जाते.सन 2024 च्या नूतन दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्या साठी प्रांताधिकारी नामदेव टिळेकर ,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड ,तहसीलदार सुरेश शेजुळ,गटविकास अधिकारी विनायक गुळवे ,तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, दुय्यम निबंधक डी एस पाटणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण ए.आर ससाणे आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी केले आहे.
माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले जाते या वह्या गटशिक्षणाधिकारी माळशिरस तालुका यांच्याकडे सुपूर्द केल्या जातात व तालुक्यातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जातात यावर्षी माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील 30 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना 5 हजार वह्यांचे वाटप संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडे करण्यात येणार आहे .
संजय देशमुख, अध्यक्ष माळशिरस तालुका पत्रकार संघ