माढ्यातील मराठा समाजाच्या उमेदवारीचा अहवाल मनोज जरांगे पाटील यांना सादर..आज होणार निर्णय…!
भूमीपुत्र न्यूज
माढा लोकसभा मतदारसंघातील मराठा समाजाने उमेदवार उभा करावा की नाही ? याबाबतचा रीतसर अहवाल माढा लोकसभा मतदार संघातील सकल मराठा व बहुजन समाजाच्या वतीने तयार करण्यात आला असून हा अहवाल शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 रोजी सकल मराठा व बहुजन समाज माढा लोकसभा मतदारसंघातील बांधवांच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन देण्यात आला.
माढा लोकसभा मतदार संघातील 6 तालुके व त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील सकल मराठा व बहुजन समाजाची गुरुवार दि 28 मार्च 2024 रोजी माळशिरस च्या अक्षता मंगल कार्यालयात संयुक्त बैठक लावण्यात आली होती या बैठकीत या 6 तालुक्यातील व इतर गावातील सकल मराठा व बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती यामध्ये 40 जणांनी माढा लोकसभा मतदार संघातून उभे राहण्याकरिता आपले अर्ज भरून दिले होते या 40 अर्जांसहित उपस्थित सर्वांचे मते जाणून घेऊन याबाबत एक रीतसर लेखी अहवाल सकल मराठा समाज व बहुजन समाज बांधवांच्या वतीने तयार करण्यात आला व हा लेखी अहवाल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शुक्रवारी रात्री उशिरा सादर करण्यात आला.
मराठा समाजाने उमेदवार उभा करायचा की नाही याबाबत संपूर्ण महाराष्ट्रातून अहवाल आले असून या सर्व अहवालांचे शनिवारी सकाळपासूनच मंथन केले जाणार असून शनिवारी सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन समाज भावना जाहीर करणार
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील