जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ?
भूमीपुत्र न्यूज
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.राज्य निवडणूक आयोगाने एक परित्रपत्रक काढत मतदार यादीसंदर्भात महत्त्वाची सूचना केली आहे.गेले अनेक दिवस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अधांतरी असल्याचं बोललं जात होतं मात्र आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील संकेत दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात एक परित्रपत्रक काढत मतदार यादीसंदर्भात महत्त्वाची सूचना केली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत असल्याचा उल्लेख निवडणूक आयोगाच्या राजपत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होण्याची जोरदार शक्यता वर्तवण्यात येत आहे.