इंडस्ट्रियल कॉरिडॉर साठी माळशिरस तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेते मंडळींचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
भूमीपुत्र न्यूज
बेंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये माळशिरस तालुक्याशेजारील म्हसवड धुळदेव चा समावेश झाला असून तेथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र शेजारीच सीमेलगत असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील कायमच दुष्काळी म्हणून संबोधले गेलेल्या गारवडचा समावेश व्हावा म्हणून गारवड गावातील नागरिकांसह माळशिरस तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी माळशिरस तहसील कार्यालयासमोर गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी ॲड सोमनाथ वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून प्रशासनासह राजकर्त्यांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले.
माळशिरस तालुक्याच्या सीमेलगतच असणाऱ्या माण तालुक्यात म्हसवड व धुळदेव या भागात इंडस्ट्रियल कॉरिडॉर होत असून या भागातील जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र या ठिकाणी होणारा इंडस्ट्रियल कॉरिडॉर साठी लागणारी जमीन कमी पडत आहे मात्र सिमेलगतच असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील गारवाड या गावात जवळपास 1751 हेक्टर जमीन उपलब्ध असून ही जमीन विनाअट या जमिनीचे मालक या औद्योगिक वसाहतीस देण्यास तयार असतानाही राज्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही.या उपलब्ध जमिनीचे हस्तांतरण बेंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरला व्हावे व गारवडचा समावेश यामध्ये व्हावा यासाठी माळशिरस तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण माळशिरस तहसील कार्यालयासमोर केले.
यावेळी ॲड सोमनाथ वाघमोडे, भानुदास सालगुडे, उत्तम जानकर, ॲड एम एम मगर ,विजय खराडे, दादा घाडगे, बाबा माने ,अतुल सरतापे, रमेश पाटील, अजित बोरकर ,गणेश इंगळे ,पांडुरंग वाघमोडे, बाळासाहेब सरगर ,अंबादास ओरसे, बाळासाहेब वावरे ,शिवराज पुकळे, समाधान काळे, साहिल आतार ,अशोक गायकवाड ,पांडुरंग पिसे, उत्तम मगर, राहुल बिडवे, किरण साठे ,अजय सकट, सोमनाथ पिसे ,विकास धाईंजे ,डॉ कुमार लोंढे ,आप्पा करचे, सुरेश टेळे, दत्ता भोसले संतोष वाघमोडे, दादा वाघमोडे ,सचिन वावरे ,धनाजी मगर, मोहन करडे ,नाना मगर ,कैलास वामन शामराव बंडगर ,अमोल यादव ,अशोक शिंदे, रेखा सुरवसे ,अश्विनी भानवसे ,संतोष राऊत, अशोक देशमुख, गोरख देशमुख ,अभिजीत केंगार, नानासाहेब पाटील, तेजस भाकरे, यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मोबाईलवरून लाक्षणिक उपोषण करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून बेंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये गारवाडचा समावेश होण्याबाबत शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगून नीरा देवघर धरणाच्या पाण्यापासून माळशिरस तालुक्यातील जी गावे वंचित आहेत त्या गावांनाही पाणी मिळवून देणार असल्याचे आवर्जून सांगितले