सत्यजित चव्हाणची राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड
भूमीपुत्र न्यूज
शंकरराव मोहीते पाटील महाविद्यालय अकलूज येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी सत्यजित बाळू चव्हाण या विद्यार्थ्यांची 26 जानेवारी 2023 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनासाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड झाली आहे.
या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहीते पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. दि 20 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2022 दरम्यान गुजरात येथे झालेल्या सराव शिबिरातून 256 विद्यार्थ्यातून महाराष्ट्रातील 14 विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. यामध्ये सत्यजित चव्हाणचा समावेश आहे. सत्यजितने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक समाज प्रबोधनपर उपक्रम राबवून जनजागृती केली आहे व महाविद्यालयाचा नावलौकिक केला आहे.
त्याच्या या यशाबद्दल सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहीते पाटील, संस्थेच्या संचालिका स्वरूपाराणी मोहीते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. बागडे डी.एस., राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय मगर, डॉ. सविता सातपुते, डॉ. सज्जन पवार, डॉ. चंकेश्वर लोंढे महाविद्यालयाचे प्रबंधक ययुवराज मालुसरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सर्वांनी सत्यजित चव्हाणला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.