अकलूज फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण
भूमीपुत्र न्यूज
अकलूज फर्टिलिटी ॲन्ड टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्यावतीने चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अकलूज फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळावा, आयव्हीएफ समज गैरसमज- खुला परिसंवाद यासह विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी डॉ.राजीव राणे,डॉ.नितीन राणे,डॉ.रेवती राणे,डॉ.मानसी देवडीकर,डॉ.विनोद शेटे,डॉ.सचिन गवळी,डॉ.श्रीकांत देवडीकर,डॉ.वैष्णवी शेटे,डॉ.अर्चना गवळी यांच्या बरोबरच या सेंटरच्या माध्यमातून आपल्या वंध्यत्वावर मात केलेले मातापिता आपल्या चिमुकल्यासह बहुसंख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत करून प्रस्ताविकात डॉ.रेवती राणे यांनी सेंटरच्या प्रगतीचा आढावा घेतला.पहिले सव्वा तीन वर्षाचे बाळ सानवी हिचा तिच्या आई वडिलांसोबत भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तर अलीहुसेन आणि अल्लाउद्दीन या जुळ्या बाळांना त्याच्याच नावे कायम ठेवीच्या स्वरुपात बक्षीस देण्यात आले .यावेळी बोलताना डॉ.राजीव राणे म्हणाले की,ज्यांना मुले होत नाहीत.त्यांचेवर उपचार करण्यासाठी पुणे,सोलापूर सारख्या ठिकाणी 4 ते 5 लाख रुपये खर्च येतो.पण अकलूज फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथील डॉक्टर सामाजिक बांधिलकी म्हणून चालवीतात. गेल्या चार वर्षात त्यांनी फायदा न बघता केवळ समाजसेवा केली. अकलूज मधील एका महिलेला 15 वर्षापासून मूल होत नव्हते. त्यांनी सहा वर्षे पंढरपूरची पायी वारी केली.परंतु त्यांना मूल -बाळ झाले नाही.परंतु अकलूज येथे उपचार घेतल्यानंतर मूल झाले.
डॉ.विनोद शेटे यांनी सांगितले की,या सेंटरच्या वतीने गेल्या चार वर्षात विविध उपक्रम राबविण्यात आले. मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात आले. या सेंटरच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळण्याचा उद्देश नसून, समाजातील गरज असलेल्या शेवटच्या घटकाना देखील फायदा व्हावा हा आमचा हेतू आहे. आजपर्यंत गेल्या चार वर्षात 250 जोडप्यांना मूल झाली आहेत.कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.अमित शेटे यांनी तर आभार डॉ.सचिन गवळी यांनी मानले.