सोलापूर भाजपाला दे धक्का… भाजपच्या मोठ्या नेत्याचा राजीनामा…. राष्ट्रवादीत होणार प्रवेश
भूमीपुत्र न्यूज
देशात आणि राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीत सर्व अलबेल असल्याचे चित्र दिसून येत नाही सोलापूर जिल्ह्यात अगोदरच अंतर्गत गटबाजीने हैराण झालेल्या भाजपाला सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष यांनी धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्याने भारतीय जनता पार्टीत खळबळ उडाली आहे .
माळशिरस तालुक्याच्या पूर्वेकडील बोरगावचे पाटील घराणे सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चेत असते यापूर्वी देखील जुन्या काळात बोरगाव चे रावसाहेब पाटील हे माळशिरस तालुक्याच्या राजकारणासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होते तत्कालीन लोकल बोर्डाचे रावसाहेब पाटील हे अध्यक्ष असताना सोलापूरच्या रंगभवन चौकात बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा बसून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करणारे व सध्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुलोद सरकारला जाहीरपणे पाठिंबा देऊन मदत करणारे रावसाहेब पाटील यांचे नातू रवींद्र शहाजीराव पाटील हे सोलापूर जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते . रवींद्र पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वासह आपल्या जिल्हा उपाध्यक्ष पदाचा 9 ऑगस्ट 2023 रोजी राजीनामा दिला आहे.
भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे यामुळे माळशिरस तालुक्याच्या पूर्वेकडील भागातील भाजपमधील एक खमक नेतृत्व राष्ट्रवादीत गेल्याने तालुक्याच्या पूर्वेकडील भागात राष्ट्रवादीला अधिकची ताकद मिळाली आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते याच दौऱ्यात बोरगाव येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत रवी पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित होता परंतु बोरगाव येथील एका दुःखद घटनेमुळे हा कार्यक्रम पुढे गेला असला तरी सोमवार दि 14 ऑगस्ट रोजी बारामती येथे रवी पाटील यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत प्रवेश होणार आहे .
गेल्या तीन वर्षापासून भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडीत असताना कोणत्याही महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत मला विश्वासात घेतले जात नव्हते यामुळे माझी घुसमट होत होती याच बरोबर भाजप हा पक्ष पूर्वीचा भाजप पक्ष न राहता, लोकशाहीच्या मार्गाने न जाता सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःचा हेतू साध्य करून घेत आहे या घटनेमुळे जनमानसात भाजपाची प्रतिमा मलिन झाल्याने मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह सोलापूर जिल्हा भाजपच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे .
रवींद्र शहाजीराव पाटील, बोरगाव