फोंडशिरस येथील उत्तम गुरव यांचे अल्पशा आजाराने निधन
भूमीपुत्र न्यूज
फोंडशिरस येथील उत्तम महादेव गुरव वय वर्ष 72 वर्ष यांचे सोमवार दिनांक 5 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून ते सर्वदूर परिचित होते, ब्रह्मचैतन्य जप संकुल परिवारातील ज्येष्ठ सदस्य, उत्कृष्ट हार्मोनियम वादक, मार्गदर्शन म्हणून महत्वपूर्ण भूमिका ते पार पाडत होते, आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकर्दीत असंख्य विद्यार्थी घडविले, तर अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत उत्तम महादेव गुरव हे डॉ. महेश गुरव यांचे वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातंवडे असा परिवार आहे. उत्तम महादेव गुरव यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे
त्यांचा तिसर्याचा विधी बुधवार दि. 7/12/2022 रोजी फोंडशिरस येथे सकाळी 7.30 वा होणार आहे.
“भूमीपुत्र न्यूज परिवारातर्फे कै. उत्तम महादेव गुरव यांना भावपूर्ण श्रद्धांजली”