प्रा. डॉ. तानाजी रावसाहेब मगर यांची सोलापूर विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळ सदस्य पदी निवड
भूमीपुत्र न्यूज
निमगाव चे सुपुत्र प्रा. डॉ. तानाजी रावसाहेब मगर यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे .नुकतेच त्यांना सोलापूर विद्यापीठाकडून निवडीचे पत्र देण्यात आले आहे .प्रा.डॉ. तानाजी रावसाहेब मगर हे गेल्या 32 वर्षापासून उमा महाविद्यालय ,पंढरपूर या ठिकाणी अध्यापनाचे काम करीत असून सन 2019 साली त्यांनी भूगोल या विषयात शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पीएचडी ही पदवी मिळवली होती तर यानंतर 2020 मध्ये ते प्रोफेसर या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले
प्रा डॉ तानाजी मगर यांनी यापूर्वीही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी 4 जिल्ह्यांकरिता असलेल्या टीचर्स बेनिव्हेंलेंट (कल्याणकारी) योजनेवर सलग 15 वर्षे यशस्वीरित्या कामकाज पाहिले आहे .याचबरोबर सोलापूर विद्यापीठाच्या प्राध्यापक संघटनेवर त्यांनी 3 वर्षे खजिनदार म्हणून यशस्वीरित्या कामकाज पाहिले त्यांचे भूगोल या विषयात असणारे 21 रिसर्च पेपर पब्लिश झालेले असून 32 वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्फरन्स ला हजेरी लावून त्या ठिकाणी पेपर वाचनही केलेले आहे याशिवाय त्यांची 2 पुस्तके प्रकाशित झाली आहेत .अभ्यासकामी त्यांनी संपूर्ण देशभर भ्रमंती केली आहे शैक्षणिक सहलींच्या माध्यमातूनही अभ्यास दौरे आयोजित केलेले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळावर त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ प्रशांतराव परिचारक, माजी प्राचार्य डॉ मिलिंद परिचारक, संस्थेचे संचालक प्रणव परिचारक ,प्रभारी प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी ,आपला युवक फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड एम एम मगर, निमगाव चे ग्रामस्थ यांच्यावतीने प्रा डॉ. तानाजी मगर यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे