श्री श्री रवीशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंगणापूर येथे शिवभक्तिसंगम सोहळा
भूमीपुत्र न्यूज
तीर्थक्षेत्र फाउंडेशन आयोजित शिवभक्ती संगम, कोटि लिंगार्चन व लक्ष भोजन सोहळा हा दि 16 फेब्रुवारी ते दिनांक 20 फेब्रुवारी 2023 दरम्यान शिखर शिंगणापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे.
या सोहळ्यासाठी मंडप पूजन व धर्म ध्वजारोहण करण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग चे श्री श्री श्री रविशंकर हे दि 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा शिखर शिंगणापूर या ठिकाणी येत आहेत.
श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी झालेल्या महा सत्संगानंतर पुन्हा एकदा सातारा व सोलापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी हा सुवर्णयोग जुळून आला आहे श्री श्री श्री रविशंकर यांच्या शिवभक्ती संगम या सोहळ्याची संपूर्ण तयारी तीर्थक्षेत्र फाउंडेशन व आर्ट ऑफ लिविंग परिवार व शिखर शिंगणापूर गावचे सर्व ग्रामस्थ यांनी मिळून पूर्ण केली आहे.
या सोहळ्यासाठी श्रीमंत छत्रपती खा उदयनराजे भोसले यांच्यासह सातारा जिल्ह्यातील भाविक व माळशिरस तालुक्यातून आर्ट ऑफ लिविंग चे हजारो साधक उमाबन, शिखर शिंगणापूर या ठिकाणी जाणार असून या कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्यातून अनेकांना निमंत्रित सुद्धा करण्यात आले आहे.बऱ्याच दिवसांनंतर आर्ट ऑफ लिविंगचे श्री श्री श्री रविशंकर येत असून साधकांनी व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.