युवक नेते शिवराज पुकळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत आरोग्य व शासकीय योजना शिबिरात 1015 जणांचा सहभाग
भूमीपुत्र न्यूज
पिलीव ता माळशिरस येथे युवक नेते शिवराज पुकळे यांच्या वाढदिवसानिमित्त महारत्न सांस्कृतिक क्रीडा व बहुउद्देशीय संस्था, झिंजेवस्ती व त्रिवेणी ज्ञानपीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व शासकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात संपूर्ण शरीर तपासणी , मोफत ई.सी.जी.,मोफत नेत्र तपासणी , मोतीबिंदू निदान व अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले यावेळी सर्व सामान्यांसाठी रेशनकार्ड नोंदणी , वाटप ,रेशन संबंधी समस्यांचे निसकरण, विधवा , घटस्फोटीत व दिव्यांग महिलांसाठी मिळणारे विविध शासकीय लाभ, श्रावण बाळ , इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना व आरोग्य शिबीर पार पडले.
या शिबिरामध्ये 1015 गरजूंनी लाभ घेतला.कार्यक्रमाचे उदघाटन सदगुरू श्री श्री श्री साखर कारखाना राजेवाडी चे चेअरमन एन शेषागिरी राव,आरीफभाई पठान यांच्या हस्ते पार पडले.यावेळी जितेंद्र पाटील, शिवप्रसाद पुकळे, दादासाहेब वगरे,सचिन भैस, पठाण वस्ती सरपंच एजाज पठाण, चांदापुरीचे विजय पाटील,शिंगोर्णी सरपंच अक्षय धांडोरे,बचेरी सरपंच महादेव पाटील,बिरा शिंदे, कल्याण जावळे ,कुमार भैस, अविनाश जेऊरकर ,माळशिरस पुरवठा विभागाचे जरक , झंजे , लहू पाटील, नितीन कपने ,जीवन गुरव, राजाभाऊ जामदार, गोविंद भैस, अशोक बगाडे ,नाथा सोलंकर, महादेव सुळे,अधिकराव माने, बाजीराव सुळे आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम सुळे,अक्षय वगरे, गणेश देशमुख, विश्वजीत गोरड, गणेश घुले,राम गलांडे,सुमित मोरे,संघर्ष पुकळे, राहुल लोखंडे, मकरंद कोपनर,ऋषिकेश देशमुख, आबासाहेब माने यांनी परिश्रम घेतले.