रोटरीच्या अध्यक्षपदी प्रिया नागणे तर सचिवपदी मनीषा गायकवाड यांची निवड
भूमीपुत्र न्यूज
रोटरी क्लब अकलूजच्या अध्यक्षपदी प्रिया नवनाथ नागणे तर सचिव पदी मनीषा गायकवाड यांची अकलूज येथे शुक्रवारी निवड करण्यात आली ही निवड सन 2024 25 या वर्षाकरिता असून अध्यक्ष व सचिव पदाचा पदग्रहण सोहळा प्रांतपाल स्वाती हेरकल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.मावळते अध्यक्ष तेजस दोभाडा यांनी नुतन अध्यक्षा प्रिया नागणे यांना तर मावळते सचिव कल्पेश पांढरे यांनी नुतन सचिवा मनिष गायकवाड यांच्याकडे पदभार सुपुर्द केला.
यावेळी नितीन कुदळे, नवनाथ नागणे ,आशिष गांधी केतन बोरावके,बबनराव शेंडगे,राजीव बनकर,शशिल गांधी, दीपक फडे,संदिप लोणकर, प्रविण कारंडे,धनंजय देशमुख,अजीत वीर, जयेश पटेल, अतुल चव्हाण, प्रमोद शेंडे, विशाल बेले, धनश्री केळकर, उत्तमराव माने,आक्काताई माने, ,तृप्ती कुदळे, वनिता कोरटकर आदीसह क्लबचे नुतन पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी 527 शालेय विद्यार्थ्यींनींना सायकल व 3 अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दळण मशीन वाटपा बरोबरच महिला आरोग्य विषयक तपासणी व मार्गदर्शन करणा-या फिरत्या वाहिकेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
क्लबसाठी योगदान देणारे रोटरीचे माजी अध्यक्ष नितीन कुदळे,अजीत विर, नवनाथ नागणे,केतन बोरावके,दिपक फडे,शशिल गांधी,आशिष गांधी यांना स्मृती चिन्ह देवुन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविण कारंडे यांनी केले तर आभार नुतन सचिवा मनिष गायकवाड यांनी मानले.
पहिल्या महिला अध्यक्षा
प्रिया नागणे यांना पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून अकलूज रोटरी क्लबच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे प्रिया नागणे यांनी यापूर्वीही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतिक सदस्य पदी प्रिया नागणे यांनी यापूर्वी काम पाहिले आहे रोटरीच्या अध्यक्षपदाला साजेसे काम करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या .