सर्वसामान्यांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची विद्यार्थ्यांनी निर्मिती करावी / धनंजय देशमुख
भूमीपुत्र न्यूज
आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी वेगवेगळे शोध संशोधकांकडून लावले जातात.विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करून सर्वसामान्यांना दैनंदिन फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी असे आवाहन माळशिरसचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी केले,ते अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेतील विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रशालेतील ४२५ मुलींनी वैज्ञानिक उपकरणे,चित्रकला प्रदर्शन, पुष्परचना व हस्तकला प्रदर्शनात सहभाग घेतला होता.
कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव,अकलूज नगरपरिषदेचे सिटी सर्व्हे विभागाचे अधिकारी मनोज गवळी,प्रशाला समिती सदस्या मनीषा चव्हाण, शशिकांत कडबाने यांच्या उपस्थितीत होते.मुलींनी स्वतः बनविलेल्या वैज्ञानिक उपकरणे,पुष्पगुच्छ व हस्तकलेचे साहित्य याची पाहणी प्रमुख अतिथींनी करून कौतुक केले.विद्यालयाचे विज्ञान विभाग प्रमुख सुनील कांबळे यांनी प्रस्ताविकेमध्ये विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाबद्दल माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले
यावेळी मुख्याध्यापक कलाप्पा सुर्यवंशी, पर्यवेक्षक यशवंत माने-देशमुख, गोरख पिसे,प्रवीण गोडसे, अनुराधा निंबाळकर,तानाजीराव भोसले,दिपाली राजमाने,आशा निंबाळकर, माधुरी भांगे व सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजश्री कणबुर तर सुहास पवार यांनी आभार मानले.