अकलूज पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात शनिवारी डी वाय एस पी कार्यालयावर मोर्चा / किरण साठे
भूमीपुत्र न्यूज
अकलूज येथील मातंग सामाजचे तरुण युवक रघुनाथ साठे,वैभव लोखंडे, मंगेश साठे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले असून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा अर्ज देवून सुद्धा अकलूज पोलीस पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही,तसेच अकलूज शहर काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्ष शैला गोसावी यांना अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी मारहाण केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांना पत्र देऊनही गुन्हा दाखल केला नाही त्यासंदर्भात शनिवार दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वा अकलूजच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती मातंग समाजाचे नेते किरण साठे यांनी भूमीपुत्र न्यूज शी बोलताना दिली .
यावेळी बोलताना ते म्हणाले की, या गंभीर प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल न केल्यास पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करून त्यांच्या कार्यालयासमोर येत्या चार दिवसांत समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. असाही इशारा देण्यात आला आहे अकलूज येथील सदुभाऊ चौकातून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर शनिवार दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 10 वा हा मोर्चा निघणार आहे .