महिलांनी कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा/अनिल फरतडे

कोळेगांव येथे महिला शेतकऱ्यांचा सन्मान
भूमीपुत्र न्यूज
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने दिनांक 25 जून ते 1 जुलै च्या कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने 27 जून रोजी “कृषी महिला शेतकरी सन्मान दिन “मौजे कोळेगांव येथे घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी गावातील महिला बचत गटाच्या अध्यक्ष व सदस्य प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती कृषी सहाय्यक श्री गणेश इंगळे यांनी दिली. त्यानंतर गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गावचे सरपंच प्रतिनिधी व कृषी विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला, सुनीता प्रदीप मंगरूळे, रूपाली नरेंद्र कुंभार, रूपाली धनंजय सावंत, साधना विजय चव्हाण, पूजा सुनील चव्हाण या महिला कालिका देवी महिला बचत गटाच्या आहेत.
अश्विनी कैलास दुपडे प्रणाली महिला बचत गट, सुरय्या अकबर मुलानी या महिलांचा सन्मान करण्यात आला.
PMFME बाबत अनिल फरतडे, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी पिलीव यांनी महिला बचत गटांना लघु उद्योगासंबंधी सर्व प्रकारची माहिती देण्यात आली त्यासाठी लागणारी कागदपत्रे व त्याची प्रक्रिया बाबत महिलांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमासाठी कोळेगावचे प्रसाद दुपडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय दुपडे,सकाळचे पत्रकार सुनील चव्हाण,धनंजय सावंत,गावातील प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.




